|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Top News » …म्हणून ओवेसी रजनीकांतवर भडकले

…म्हणून ओवेसी रजनीकांतवर भडकले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनेही मोदी-शाह यांना कृष्ण-अर्जुन संबोधून त्यांचे कौतुक केले होते.

रजनीकांत यांच्या या वक्तव्यावर एआयएमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसीं यांनी तोंडसुख घेतले आहे. ‘जर मोदी-शाह कृष्ण-अर्जुन असतील तर या पूरपरिस्थितीत कोण पांडव आणि कोण कौरव?, असा प्रश्न औवेसींनी रजनीकांत यांना केला आहे. तसेच तुम्हाला, देशात पुन्हा एकदा महाभारत घडवायच आहे का? असा सवालही औवेसींनी केला आहे.

दरम्यान, कलम 370 हटविल्यानंतर रजनीकांत यांनी मोदी-शाहंचे कौतुक केले होते. ‘गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोडी म्हणजे कृष्ण आणि अर्जुनाची जोडी आहे. मिशन काश्मीर पूर्ण केल्याबद्दल अमित शाहंना शुभेच्छा, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.

Related posts: