‘लालबागचा राजा’ मंडळाकडून 25 लाखांची मदत

ऑनलाइन टीम / मुंबई :
कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील पूरग्रस्तांसाठी अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. अन्नधन्य व कपडय़ाबरोबरच पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक योगदान दिले जात असून मुंबईतील गणेश मंडळांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लालबागचा राजा’ मंडळानं पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची, तर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं 5 लाखांची मदत दिली आहे.
मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा केली जाणार असून ‘लालबागचा राजा’ चे मंडळ रायगडमधील जुई गावच्या धर्तीवर एक संपूर्ण गाव दत्तक घेऊन त्याचे पुनर्वसन करणार आहे. सरकारी यंत्रणांनी मदत घेऊन त्या बाबतची रूपरेषा ठरवण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱयांनी दिली आहे.