|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » ‘या’ भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय सरकारने घ्यावा : पवार

‘या’ भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय सरकारने घ्यावा : पवार 

ऑनलाइन टीम /कोल्हापूर : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेले दोन-तीन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱयावर आहेत. बुधवारी त्यांनी शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती व दुग्धव्यवसायाचे झालेले नुकसान लक्षात घेता, या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घ्यावा.

शरद पवार म्हणाले की, अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारने घ्यायला हवा. अलमट्टीचं पाणी वेळीच सोडलं असतं तर सांगली, कोल्हापुरात पूर आला नसता. कर्नाटक सरकारने पाणी सोडलं नाही. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये संवाद झाला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांनी सांगितले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे तरी पाण्याचा विसर्ग सुरु झाला नाही. त्यानंतर पंतप्रधनांशी मी बोलल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु झाला.

 

Related posts: