|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकानं सन्मान

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकानं सन्मान 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱया राष्ट्रपती पोलीस पदकांची आज, बुधवारी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहायक पोलीस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंड कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रामचंद्र जाधव यांना हे तिसरे राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तर राजाराम पाटील यांना दुसऱयांदा राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे.

 

Related posts: