|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » 15 ऑगस्ट : मुंबई, दिल्लीमध्ये सुरक्षतेत वाढ

15 ऑगस्ट : मुंबई, दिल्लीमध्ये सुरक्षतेत वाढ 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

15 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहारांमध्ये दहशतवादी हल्ला करु शकतात. याच पार्श्वभुमीवर देशभरात नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सर्व सुरक्षा कंपन्या सतर्क झाल्या आहेत. कलम 370 जम्मू-कश्मीर मधून हटवल्यानंतर संतापलेले दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मात्र गुप्तचर यंत्रणेकडून याबद्दल पूर्वसुचना देण्यात आली आहे. तसेच दिल्ली येथेसुद्धा सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. सर्व प्रमुख ठिकाणांवर जवानांची करडी नजर असणार आहे.

मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठय़ा शहरात येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्मयता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह दिल्ली इतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

Related posts: