|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » महिंद्राचा ‘नोवो ट्रक्टर’ लवकरच भेटीला

महिंद्राचा ‘नोवो ट्रक्टर’ लवकरच भेटीला 

शेतीच्या कामासाठी होणार उपयोग : पूर्ण इलेक्ट्रिक ट्रक्टर

नवी दिल्ली

 ऑटो क्षेत्रात कार्यरत असणारी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनी शेतकऱयासाठी उपयोगी असणारा व शेतीचे काम सोप व सुलभ होण्यासाठी एका छोटय़ा ट्रक्टरची निर्मिती करणार असल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नुकतीच ट्विटरच्यामाध्यमातून केली आहे.

अनेक शेतकरी बांधव मोठा ट्रक्टर विकत घेता येत नसल्याने ते मोठा ट्रक्टर घेण्यासाठी प्रसंगी कर्ज घेत असतात. परंतु काही काळा हे कर्ज फेडता न आल्याने काहीजण आत्महत्या करत असल्याचे पहावयास मिळते. परंतु आम्ही सादर करणार असलेले उत्पादन हे मर्यादित व कमी पैशात विकत घेण्याजोगे असल्याने यांचा लाभ शेतकरी बंधुना होणार असल्याचा विश्वास आनंद महिंद्रा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

लहान शेतकऱयांना लाभदायक

आम्ही सादर करणार असलेला ट्रक्टर हा आकाराने लहान असून त्याचा वापर करणे अगदी सोपे असल्याचे म्हटले आहे. कारण हा ट्रक्टर इंधनना विना चालवता येणार असून त्याला रिमोडने नियंत्रित करता येणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.

फिचर्स

महिंद्रा नोवो टॅक्टर हा संपूर्ण इलेक्ट्रिक असून तो रिमोटच्या आधारे नियंत्रित करता येणार आहे. त्यामध्ये 3 गिअर आहेत. तर त्याला स्पीड लॉकची सुविधा देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related posts: