|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीतून 500 टन कचरा उचलला

सांगलीतून 500 टन कचरा उचलला 

नितीन कापडणीसः बाजारपेठ सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशीलः

अजूनही प्रमाणापेक्षा अधिक कचरा : हजारहून अधिक बाहेरील कर्मचारी सहभागी

प्रतिनिधी/ सांगली

महापुराने सांगली शहराची संपूर्ण घडी विस्कटली होती. आता महापूर पूर्ण हटला आहे. त्यामुळे सांगली शहर स्वच्छ करून ते चकाचक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्वच्छतेचे फार मोठे आव्हान पेलण्यासाठी राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आले आहेत. त्यांच्या सहाय्याने शहर स्वच्छ करण्यात येत आहे. आता आगामी दोन दिवसांत संपूर्ण सांगली चकाचक करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कापडणीस म्हणाले, सांगलीत कोणतीही रोगराई पसरू नये त्यासाठी स्वच्छतेकडे आणि औषध फवारणीकडे लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे जस जसा महापूर हटत गेला, तस तशी स्वच्छता सुरू केली आहे. त्यामुळे ज्या ज्या भागातील पाणी हटले आहे त्या सर्व भागातील रस्ते, सार्वजनिक जागा स्वच्छ करण्यात आल्या आहेत. बाहेरून 662 कर्मचारी 131 अत्याधुनिक मशिनरीसह आल्याने शहरातील स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात 500 टनाहून अधिक कचरा गोळा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारपेठेतील स्वच्छता मोठे आव्हान

शहरातील नागरी वस्तीमधील स्वच्छता करण्यात आली आहे. आता बाजारपेठेतील पाणी हळूहळू कमी होवू लागले आहे. या भागातील स्वच्छता मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. पण, अजूनही मारूती रोड व बाजारपेठेत पाणी साचले आहे. हे पाणी कमी झाल्यानंतर याठिकाणची स्वच्छता करण्यात येणार आहे.  मारूती रोड आणि शिवाजी मंडई चौकात अजूनही पाणी साचून राहिले आहे. हे पाणी सेक्शन मशिनव्दारे बाजूला काढले जाणार आहे. त्यानंतर दुकानदारांना साफसफाईला मदत करण्यात येणार आहे. शहरात 60 हून अधिक टँकरने ही साफसफाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना स्वच्छतेसाठी लागेल ती मदत करण्यास महापालिकेचे प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कचऱयाचे ढिग बाजूला काढण्यासाठी विशेष टीम

शहरातील मोठय़ा प्रमाणात कचरा काढण्यासाठी बीव्हीजी संस्थच्या 29 मशीन घेवून 100 कर्मचारी येत आहेत. या कर्मचाऱयांच्यामार्फत मोठय़ाप्रमाणात स्वच्छता करण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर नगर पालिकेकडून 250 लोक त्यांची साधने घेवून येत आहेत. तसेच अवनी टीमच्या सदस्याही कचरा गोळा करण्यासाठी सहभागी होत आहेत. त्यामुळे हा कचरा तातडीने साफसफाई होणार आहे. गुरूवारपासून या नवीन टीम कार्यरत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील सर्व स्ट्रीटलाईट सुरू

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना यापुढील काळात कोणतीही अडचण येवू नये म्हणून शहरातील सर्व स्ट्रीटलाईट दुरूस्त करण्यात येत आहेत. या स्ट्रीटलाईट सुरू झाल्याने शहरात रात्रीच्यावेळीही स्वच्छता करण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांना याचा लाभ होणार आहे. पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठाही सुरू झाल्याने पाणी पुरवठा गुरूवारपासून सुरळीत होणार आहे. याशिवाय 58 पथके दोन शीफ्टमधून कार्यरत होत असल्याने हा कचरा हटला जात आहे.

चौकट

पूरपट्टय़ातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनसाठी प्रयत्न

शहरातील पुरपट्टय़ात राहणाऱया व्यक्तीचे कायमस्वरूपी पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी ही पूरपरिस्थिती पूर्णपणे निवळल्यानंतरच विचार करण्यात येणार आहे. मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सूचनेनुसार त्याचाही सर्व्हे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अजूनही त्याला वेळ लागणार आहे.

 

Related posts: