|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवाशक्तीच्या कल्पनेतून साकारतोय स्वातंत्र्यदिन

युवाशक्तीच्या कल्पनेतून साकारतोय स्वातंत्र्यदिन 

बेळगाव / प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिन हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस. या दिनाच्या निमित्ताने आपण अनेक उपक्रमांची आखणी करतो. तसेच देशासाठी काही करण्याची उर्मी नव्याने जागवितो. देशासाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या युवाशक्तीच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना देखील अशाच भावना प्रकट करणाऱया आहेत. स्वातंत्र्यदिन हा प्रत्येकांसाठी महत्त्वाचा असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले अनेक वीर नेत्यांनी आपले प्राण पणाला लावून या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी याच दिवशी न करता आपल्या मनात सतत कृतज्ञता भाव त्यांच्याबद्दल असला पाहिजे. कारण आज त्यांच्यामुळे आपण सुखाचा श्वास घेऊ शकत आहोत. त्यामुळे आपला भारत स्वतंत्र तर झाला होता. पण आता प्रगतीपथावर वाटचाल देखील करीत आहेत. तर यासंदर्भात अनेक जणांशी साधलेला संवाद…

देशप्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकांची पद्धत वेगळी : गायत्री

देशप्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकांची पद्धत वेगळी आहे. जसे लष्करातील व्यक्ती देशासाठी करतात तसेच आपणही भारतासाठी काम करू शकतो. मग ते स्वच्छ भारत वगैरे देखील असू शकते.

स्वच्छता राखणेही देशप्रेमच : मनस्वी

ज्या व्यक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेत त्यांना आपण सतत स्मरणात ठेवल पाहिजे आणि आपण जे रस्त्यावर थुंकतो हे सगळ आपण करू नये तर स्वच्छता राखावी हे देखील एक देशप्रेम आहे. सगळय़ात महत्त्वाचे देशप्रेम म्हणजे देशातील भ्रष्टाचार थांबवणे.

तेव्हा खरे स्वांतत्र्य येईल… : सलीम माडिवाले

सगळे जात, धर्म, नष्ट करून फक्त मनुष्यधर्म यायला हवं आणि एकता जेव्हा येईल… तेव्हा खरे स्वातंत्र्य येईल…, असे ती म्हणाली.

 

Related posts: