|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » भरधाव कारची भिंतीला धडक; भाजप खासदाराच्या मुलाला अटक

भरधाव कारची भिंतीला धडक; भाजप खासदाराच्या मुलाला अटक 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगातील कारने भिंतीला धडक दिल्याप्रकरणी भाजपा खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश गांगुलीला अटक करण्यात आली आहे.

आकाश गांगुलीने मद्यधुंद अवस्थेत कार चालविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. त्यानंतर पोलिसांनी आकाशला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गांगुलीने गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याच्या भरधाव वेगातील कारने गोल्फ गार्डन परिसरातील एका क्लबच्या भिंतीला धडक दिली. त्यावेळी अनेकांचे प्राण थोडक्मयात बचावले. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर आज सकाळी जाधवपूर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 427, 279 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत आकाशला अटक केली.

Related posts: