|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Automobiles » टाटा टियागो, टिगोरचे जेटीपी मॉडेल लाँच

टाटा टियागो, टिगोरचे जेटीपी मॉडेल लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स’ने ‘टियागो जेटीपी’ आणि ‘टिगोर जेटीपी’चे नवीन मॉडेल बाजारात दाखल केले आहे.

टियागो आणि टिगोरचे हे अपडेटेड मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये अँड्रोईड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसोबतच 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्रायव्हर सीट-बेल्टसह को- ड्रायव्हर सीट- बेल्ट रिमाइंडर तसेच हाय-स्पीड अलर्ट सिस्टिमसुद्धा देण्यात आली आहे. ड्रायव्हरनं वेग वाढवल्यास वेग कमी करण्यासाठी आपोआप अलर्ट मिळणार आहे.

अपडेटेड टियागो जेटीपी आणि टियारो जेटीपीमध्ये 1.2 लीटर, 3 सिलेंडर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनची क्षमता 112 एचपी असून 150 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या मॉडेलची सुरूवातीची किंमत 6.69 लाख आणि 7.59 लाख इतकी आहे. अपडेटेड मॉडेलच्या तुलनेत टियागो जेटीपीच्या किंमतीत 30 हजार रुपयांनी व टिगोर जेटीपीच्या किंमतीत 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Related posts: