|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » जम्मू-काश्मीरमधील शाळा-महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरू

जम्मू-काश्मीरमधील शाळा-महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरू 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यापूर्वी तेथे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून खुले करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर राज्यातील इंटरनेट, फोन सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सेवांवरील बंदी हटविण्यात येईल. जम्मू काश्मीरमधील बंदी हटविण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने काश्मीर प्रश्न संवेदनशील आहे. त्याठिकाणची परिस्थिती सर्वसामान्य होण्यासाठी सरकारला वेळ द्यायला हवा. कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यावर लवकर काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले होते.

Related posts: