|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » बडवे इंजिदानयरिंगच्या वतीने पुरग्रस्तांना 50 लाखांची मदत

बडवे इंजिदानयरिंगच्या वतीने पुरग्रस्तांना 50 लाखांची मदत 

पुणे / प्रतिनिधी : 

बडवे इंजिनियरिंग लिमिटेड यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. यावेळी बडवे इंजिनियरिंगचे व्यवस्थापकिय संचालक श्रीकांत बडवे, संचालिका सुप्रिया बडवे आदी मान्यवर उपस्थित होते. या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले.

बडवे ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नधन्य, बिस्कीटपुडे, बाटलीबंद पाणी, कपडे, औषधे देखील पाठविण्यात आली आहेत. तसेच बडवे इंजिनियरिंगच्या आपत्ती व्यवस्थापनातील काही कर्मचारी देखील यावेळी तेथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती बडवे इंजिनियरिंगच्या संचालिका सुप्रिया बडवे यांनी दिली.

 

Related posts: