|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » मतदार ओळखपत्र आधारशी जोडा; निवडणूक आयोगाची मागणी

मतदार ओळखपत्र आधारशी जोडा; निवडणूक आयोगाची मागणी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने विधी व न्याय मंत्रालयाला पत्राद्वारे केली आहे.

‘एक व्यक्ती, एक मत’ हवे असेल तर निवडणूक ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. तसे झाल्यास बोगस मतदारांना आळा बसू शकतो. फेब्रुवारी 2015 मध्ये पोल पॅनलने आधार कार्ड-निवडणूक ओळखपत्र लिंक करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. हा राष्ट्रीय मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाचा भाग होता. मात्र, ऑगस्ट 2015 मध्ये एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा हा प्रयत्न थांबवला. सार्वजनिक विकास योजनांचे लाभ आणि अन्य धान्य पुरवठा किंवा गॅस सबसिडी वगळता अन्य कोणत्याही कारणांसाठी आधार कार्डाचा वापर करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. आतापर्यंत 32 कोटी आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्राशी लिंक झाले आहेत.

Related posts: