|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » भविष्यात काय धोरण असेल हे सांगता येणार नाही : राजनाथ सिंह

भविष्यात काय धोरण असेल हे सांगता येणार नाही : राजनाथ सिंह 

ऑनलाइन टीम / पोखरण : 

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये मोठं विधान केलेले आहे. भारत अण्वस्त्रसज्ज असला, तरी पहिल्यांदा वापरणार नाही हे आमचे धोरण राहिले आहे, पण भविष्यात काय धोरण असेल हे सांगता येणार नाही ते परिस्थितीवर अवलंबून असेल असा सज्जड दमच राजनाथ सिंह यांनी दिला. ज्या पोखरणमध्ये भारताने पहिल्यांदा अणुचाचणी केली त्याच ठिकाणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना राजनाथ यांनी पाकिस्तानला गर्बित इशारा दिला.

ते म्हणाले, 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्वांमुळे सुलभता आणि सुशासन याला राजकारणात चालना मिळाली. सबका साथ, सबका विश्वास याची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली.

 

Related posts: