|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आबांची उणीव जाणवते : पवार

आबांची उणीव जाणवते : पवार 

प्रतिनिधी/ सांगली

स्व. आर. आर. पाटील यांची उणीव आज प्रकर्षाने जाणवते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आबांच्या जयंती निमित्ताने सोशल मीडियावरुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सांगली-कोल्हापूरात उदभवलेल्या पूरस्थितीत 2005 साली त्यांनी केलेले काम आठवते. लोकांप्रतीची कळकळ आणि कर्तृत्वामुळे आबांना कधीही सत्तापदाच्या मागे जाण्याची वेळ आली नाही. उलट सगळी पदे आबांकडे त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे आली. आणि त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. सत्तेत असतानाही कधीही गावाच्या मातीला आणि मातीतल्या माणसांना आबांनी अंतर दिले नाही. शेवटच्या माणसाशी आबांची नाळ जोडलेली होती. काहीच हातात नसताना आबा लोकांचे प्रश्न सोडवायला शिकले. आपल्या कार्यामुळे आणि धडाडीच्या निर्णयामुळे आबांनी निर्माण केलेली ओळख कधीही महाराष्ट्राच्या मनातून पुसली जाणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Related posts: