|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles » ‘होन्डा’ची ‘ब्रीझ’ एसयुव्ही लाँच

‘होन्डा’ची ‘ब्रीझ’ एसयुव्ही लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘होन्डा’ने आपली ‘ब्रीझ’ ही एसयुव्ही कार लाँच केली आहे. सुरुवातीला ही कार चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तुर्तास ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध नसेल.

या कारमध्ये 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तर या कारचे इंजिन हे 193 एचपी क्षमता उत्पन्न करते. होन्डा कंपनी आपल्या या नव्या कारची विक्री ही चीनमधून करणार आहे. तर भारतात होन्डा कंपनी ही ‘एचआर-व्ही एसयूव्ही’ लाँच करण्याचा तयारीत आहे.

होन्डाने नुकतेच ‘ब्रीझ’ कारचे काही फोटो प्रदर्शित केले असून, या फोटोमुळे या कारची अनेक माहिती समोर आली आहे. होन्डा कंपनीच्या नव्या एसयूव्ही कारमध्ये 5 जणांची आसनव्यवस्था आहे. ही कार होन्डाच्या सीआर-व्ही कारसारखी आहे.