|Friday, December 6, 2019
You are here: Home » मनोरंजन » गाण्याची मैफील पुन्हा सजणार

गाण्याची मैफील पुन्हा सजणार 

 कलर्स मराठीवर सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सुरांची पुन्हा गट्टी जमणार! कारण ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये गायकांनी विविध शैलींमधील सादर केलेली गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या दोन पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व पुन्हा सुरू होत आहे. या पर्वाचे विशेष म्हणजे स्पर्धकांना वयाची अट नसेल. 5 ते 55 हा वयोगट असणार आहे म्हणजेच बच्चे कपंनीपासून सगळय़ा वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. या पर्वाचा शुभारंभ सप्टेंबरमध्ये होईल. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आपल्या सगळय़ांचा लाडका स्पर्धक पुष्कर जोग प्रत्येक शहरात सूरवीरांना प्रोत्साहन देईल. तर सुप्रसिद्ध संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी प्रत्येक शहरातून सूरवीरांचा शोध घेतील.

Related posts: