|Thursday, February 27, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंगचे ‘गॅलेक्सी नोट 10’, ‘नोट 10 प्लस’ स्मार्टफोन लाँच

सॅमसंगचे ‘गॅलेक्सी नोट 10’, ‘नोट 10 प्लस’ स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

सुप्रसिद्ध मोबाईल कंपनी ‘सॅमसंग’ने ‘गॅलेक्सी नोट 10’ आणि ‘नोट 10 प्लस’ हे प्रिमियम स्मार्टफोन आज लाँच झाले आहेत. 23 ऑगस्टपासून हे फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

‘सॅमसंग नोट 10’ मध्ये 6.3 इंच डिस्प्ले, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर ‘नोट 10 प्लस’ मध्ये 6.8 इंच डिस्प्ले, 12 जीबी रॅमप्रमाणे 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेजचे दोन व्हेरिएंट आहेत. यामध्ये डय़ुअल सीम सोबत मेमरी कार्ड स्पेस आहे. ही स्पेस ‘नोट 10’ मध्ये नाही. नोट 10 मध्ये 3500 एमएएच तर नोट 10 प्लसमध्ये 4300 एमएएचची बॅटरी आहे.

या फोनमध्ये एस-पेन आधीपेक्षा अपडेट करून देण्यात आला आहे. 10 मिनिटांत चार्ज झाल्यानंतर तो 8 ते 10 तास एस-पेनची बॅटरी चालते. या दोन्ही फोनचे कॅमेरेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. व्हिडिओ रेकॉर्ड करताना अनेकदा समोरची वस्तू स्थिर नसते. त्यामुळे मोबाईल कॅमेऱयाचा फोकस डळमळीत होतो. व्हिडिओमध्ये फोकस ही खराब होतो. पण या सुविधेमुळे मोबाइलचा फोकस डळमळीत होणार नाही, समोरची वस्तू स्थिर नसली तरी त्याचा परिणाम होणार नाही.

Related posts: