|Monday, February 24, 2020
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉनच्या भारतातील सर्वात मोठय़ा कॅम्पसचा शुभारंभ

ऍमेझॉनच्या भारतातील सर्वात मोठय़ा कॅम्पसचा शुभारंभ 

हैदराबाद

  ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज अमेरिकन कंपनी ऍमेझॉनने बुधवारी आपल्या सर्वात मोठय़ा कॅम्पसचा शुभारंभ भारतामधील हैदराबाद येथे केला आहे. अमेरिकेच्या बाहेर ऍमेझॉनच्या हक्काचा हा एकमेव कॅम्पस असल्याचे कंपनी यावेळी स्पष्टीकरण दिले आहे. यात 15 हजार कर्मचारी काम करणार आहेत. तर भारतातमधील ऍमेझॉन कर्मचाऱयांची संख्या 62 हजार वर पोहाचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. एकूण क्षेत्रफळाचा विचार करता ऍमेझॉनचा एका ठिकाणी सर्वात मोठी इमारत असणारड आहे. यामध्ये 18 लाख वर्गफूटाचे कार्यालय ठिकाण आणि 30 लाख वर्गफूटात या कॅम्पस राहणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

Related posts: