|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वर्ल्ड रेकॉर्डला नोंद

वर्ल्ड रेकॉर्डला नोंद 

वार्ताहर /तिरकवाडी :

माझेरी शाळेतील उपक्रम शील शिक्षक भोलचंद सोमा बरकडे व माझेरी पुनर्वसन शाळेच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डला  नोंद झाली आहे.

भोलचंद बरकडे सर हे दि.28.06.2012 रोजी माझेरी पुनर्वसन ता. फलटण शाळेवर रुजू झाले तेव्हा या शाळेचा पट 13 होता . त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत शाळेच्या प्रगतीला सुरुवात केली. त्यांना ग्रामस्थ पालक यांनी योग्य साथ दिली. त्यांनी 28/6/2012 पासून ते आजअखेर अखंडपणे सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत शाळा चालवतात. त्यांच्या चांगल्या कामामुळे शाळेचा पट 13 या संख्यावरून 186 या पटसंख्येवर पोहचला आहे. त्यांच्या या कामाची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेने घेतली व त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया हा बहुमान संपन्न केला ते चीफ एडिटर पवन सोलंखी, अजित कर्णे . वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट वितरण प्रसंगी माझेरीच्या सरपंच सौ.सीताबाई दिघे  ,माजी सरपंच  ज्ञानेश्वर दिघे , उपसरपंच विष्णु दिघे , गणेश दिघे  शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष गणेश दिघे , उपाध्यक्षा मीनाक्षी कोरडे

 , शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. त्यांचे ज्ञानदानाचे हे काम गेली सात वर्षे अखंडपणे चालू आहे. त्यांचे फळ त्यांचे विद्यार्थी  क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत, शिष्यवृत्ती धारक 45 विद्यार्थी, नवोदय 7 विद्यार्थी, सैनिक स्कूल निवड 8 विद्यार्थी असे काम आहे. या कामात त्यांना मोलाची साथ देणारे उपशिक्षक गणेश पोमणे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

या सत्कार प्रसंगी विनायक राऊत, हनुमंत कोकरे,बाबा बनकर, दत्तात्रय कोरडे, राजू बनकर, शिवाजी शेंडे, शेखर कांबळे, प्रवीण दिघे, किसन दिघे, बाळू दिघे उपस्थित होते.

 

Related posts: