|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस दलातील ‘नयना’ने घेतला अखेरचा श्वास

पोलीस दलातील ‘नयना’ने घेतला अखेरचा श्वास 

 प्रतिनिधी /बेळगाव :

गेल्या दीड वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झालेली नयना सध्या आयुक्तांच्या बंगल्यात निवृत्तीचे जीवन जगत होती. शनिवारी हृदयाघाताने तिचा मृत्यू झाला असून सरकारी इतिमामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नयनाच्या निधनाने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

बेळगाव पोलीस श्वानदलातील नयना ही स्फोटके तपासणारी श्वान होते. 21 ऑक्टोबर 2009 रोजी जन्म झालेल्या लॅब्रडर लिट्रीवर जातीची नयनाने 25 मे 2010 पासून 5 एप्रिल 2011 पर्यंत बेंगळूर येथील कर्नाटक पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले होते.

स्फोटके शोधण्यात नयना माहीर होती. एकूण 9 वर्षे 10 महिने 3 दिवस ती जगली. 1 मार्च 2018 रोजी आजारपणामुळे तीला पोलीस दलातून निवृत्त करण्यात आले होते. पूर्वी पोलीस आयुक्तालय सुरु होण्यापूर्वी ती जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अखत्यारित काम करीत होती. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरु झाल्यानंतर तिच्यावर शहराची जबाबदारी होती.

Related posts: