|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles » मारुती सुझुकीची ‘एस-प्रेसो’ होणार लाँच

मारुती सुझुकीची ‘एस-प्रेसो’ होणार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’ आपली बहुप्रतिक्षीत ‘एस-प्रेसो ही कार लवकरच बाजारात दाखल करणार आहे. येत्या 30 सप्टेंबरला ही कार लाँच होण्याची शक्मयता आहे.

या कारची डिझाईन एसयुव्ही कारसारखी असणार आहे. ही कार टाटा टियागो आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन असणारी रेनॉल्ट क्विड यासारख्या गाडय़ांशी स्पर्धा करणार आहे. या कारबाबत अद्याप कंपनीकडून फिचर्सबाबत माहिती देण्यात आली नाही.

या कारच्या फिचर्स आणि डिजाइनची माहिती समोर आली आहे. ही कार ‘ऑटो एक्सपो 2018’ मध्ये सादर करण्यात आलेल्या फ्यूचर-एस या कारचे प्रॉडक्शन व्हर्जन आहे. तरुण पिढीला समोर ठेवून ही कार डिजाइन करण्यात आली आहे. कारमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन असण्याची शक्मयता आहे. हे इंजिन काही प्रमाणात बीएस-6 एमिशन नॉर्म्ससारखे असेल. तसेच या कारमध्ये 5- स्पीड मॅन्युअल’ आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स हे पर्याय असणार आहे.

या कारची उंची जास्त असल्याने सर्वाधिक ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. या गाडीची सुरुवातीची किंमत अंदाजे 4 लाखांपासून सुरु होईल.