|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 1 ते 7 सप्टेंबर 2019

मेष

रवि, मंगळ युती, रवि, सूर्य लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवताना गिऱहाईकाला दुखवू नका. मोठेपणाचा हेका चालवू नका. राजकीय- सामाजिक कार्यात चर्चा करतांना प्रश्न वादाकडे जाईल. मनावर, शरीरावर दडपण येईल. सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रति÷ा राहील. घरातील व्यक्ती तुमचा मान ठेवतील. सहाय्य करतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. नवे काम मिळेल. मनोभावे श्री गणेशपूजन करा. रागावर ताबा ठेवा.


वृषभ

बुध, मंगळ युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. श्री गणेश पूजन मनाप्रमाणे कराल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात क्षुल्लक अडचण येईल. गोड बोला. राजकीय- सामाजिक कार्यात सर्वांच्या मतांचा विचार करा, मगच तुमचे मत व्यक्त करा. तणाव होऊ देऊ नका, म्हणजे तुमचे महत्त्व वाढेल. घरातील कामे होतील. वाटाघाटीचा प्रश्न निघेल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक होईल. ओळखी होतील. आपसात गैरसमज होईल. घर, जमीन खरेदीचे ठरवाल.


मिथुन

रवि, मंगळ युती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. श्री गणेशाच्या कृपेने तुमची बरीच कामे होतील. मनोभावाने प्रार्थना करा. धंद्यात फायदा होईल. शेतकरी वर्गाला उभारी देणारी घटना घडेल. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात नावलौकिक वाढेल. लोकसंग्रह तयार करा. घरातील व्यक्तींना खूष कराल. कला-क्रीडा स्पर्धेत उत्साह वाढणारी घटना घडेल. ओळखी होतील. कोर्टकेसमध्ये सावध रहा. धावपळ होईल.


कर्क

रवि, चंद्र लाभयोग, रवि, बुध युती होत आहे. जुने प्रकरण मिटवता येईल. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. थोरा-मोठय़ांच्या ओळखीने अडचणीत आलेले काम  करून घ्या. घरातील प्रश्न लवकर सोडवा. वाटाघाटीत यश मिळेल. श्री गणेशाच्या कृपेने शुभ समाचार मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात योजनांना पूर्ण करा. स्वत:चे स्थान निर्माण करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस संपवा.


सिंह

रवि, मंगळ युती, शुक्र, शनि त्रिकोण योग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला यश देणारा ठरेल. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. राजकीय- सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. दौऱयात लोकांच्याबरोबर राहून समस्या ओळखा. कामे करा. श्री गणेशाच्या पूजनाचे कार्य नीट पूर्ण कराल. कला- क्रीडा स्पर्धेत चमकाल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. घरातील वाद मिटवता येईल. घर, वाहन खरेदी करण्याचे ठरवाल.


कन्या

चंद्र, गुरु लाभयोग, शुक्र, नेपच्यून प्रतियुती होत आहे. व्यवसायात उतावळेपणा करून पैसे गुंतवू नका. गोड बोलून फसगत होऊ शकते. धंद्यात कष्ट घ्या. रागावर ताबा ठेवा. योग्य व्यक्तीचा सल्ला  घ्या. तुमचे मन स्थिर राहील. सहकारी, नेते राजकीय-सामाजिक कार्यात तणाव निर्माण करण्याची शक्मयता आहे. घरातील लोकांना नाराज करू नका. कोणतेही काम करतांना बेसावध राहू नका. वाहन जपून चालवा. स्पर्धा कठीण वाटेल.


तुळ

बुध, हर्षल त्रिकोण योग, सूर्य, मंगळ युती होत आहे. रविवार, सोमवार रागावर ताबा ठेवा. श्री गणेशाच्या पुजेची तयारी करताना गोंधळ होऊ शकतो. संयमाने वागा. श्री गणेश पूजन नीट पूर्ण होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. नवीन ओळखी होतील. योजना पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, लाभ मिळेल. कल्पना शक्तीला चालना मिळेल. विशेष कराल. नोकरीत फायदा होईल. शेतकरी वर्गाला समाधान मिळेल.


वृश्चिक

रवि, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. श्री गणेश पूजनाची तयारी व पूजा मनाप्रमाणे कराल. इतरांच्या भावना समजून घ्या. मन विचलीत करू नका. धंद्यात वाढ होईल. राजकीय- सामाजिक कार्यात  लोकांच्या पर्यंत पोहचता येईल. आर्थिक साहाय्य मिळेल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवे मित्र तयार होतील. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. शेतकऱयांना फायदा होईल.


धनु

रवि, मंगळ युती, रवि, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. श्री गणेश विघ्नहर्ता तुमचे संकट दूर करेल. पूजा मनोभावे कराल. गुरुवार, शुक्रवारी राजकीय- सामाजिक कार्यात धावपळ होईल. तुमच्या कामात अडथळे येतील. धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न करा. ओळखीचा उपयोग  होईल. कला, क्रीडा स्पर्धेत चमकाल. नवे काम मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल. शेतकरी वर्गाची समस्या कमी होईल. इतरांची मदत घेता येईल.


मकर

साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य मंगळ युती होत आहे. धंद्यात  फायदा होणारी कामे येतील. परंतु माणसांची नियत ओळखूनच निर्णय घ्या. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढले तरी कट कारस्थान करणारे लोक अडचणी निर्माण करतील. आरोप करतील. तुमचा राग वाढेल, असे वक्तव्य विरोधी करतील. संयम ठेवा. ध्येयावर लक्ष ठेवा. कला, क्रीडा स्पर्धेत मोठे आश्वासन मिळेल. कायदा पाळा.


कुंभ

रवि, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. मागे पडलेली धंद्यातील कामे होतील. श्री गणेश पूजनाच्या दिवशी चिडचिडेपणा होऊ शकतो. राजकीय- सामाजिक  कार्यात महत्त्व वाढेल. रविवार, सोमवारी वाहन जपून चालवा. नोकरीत बदल करण्याचा विचार करता येईल. वरि÷ांना खूष कराल. संसारात मुले आनंद देतील. घर, जमीन खरेदी- विक्रीचा विचार कराल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टाची कामे होतील.


मीन

चंद्र मंगळ केंद्रयोग, चंद्र, गुरु युती होत आहे. मंगळवार, बुधवारी तुमचा संताप वाढवण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही अस्थिर व्हाल. संयम ठेवा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. धंद्यात काम मिळेल. नोकरांना दुखवून बोलू नका. श्री गणेशपूजन यथासांग कराल. मनोभावे प्रार्थना करा. राजकीय, सामाजिक कार्यात कुणालाही कमी लेखू नका. भडक वक्तव्य टाळा. स्पर्धेत कष्ट पडतील. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. मुले, जीवनसाथी यांच्याशी प्रेमाने वागा.

Related posts: