|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » फेसबुकचे ‘हे’ फीचर होणार बंद

फेसबुकचे ‘हे’ फीचर होणार बंद 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्किंग साइट फेसबुक लवकरचं सर्वांचं आवडतं फीचर बंद करणार आहे. फेसबूक आता लाइक काउंट फिचर हटवणार आहे. फेसबुकनं म्हटंल आहे की, आता पोस्टला किती लाइक आहेत हे मित्रांना आणि इतर युजर्सना पाहता येणार नाही.

फोटो, व्हिडिओ तसेच कमेंट यांना मिळणाऱया लाइकमुळे पोस्ट गंभीरपणे पाहणाऱयांची संख्या कमी होते. हे फीचर बंद केल्यास पोस्टमध्ये नेमकं काय आहे त्याकडं युजर्स लक्ष देतील. यासाठीच फेसबुकनं हा निर्णय घेतला आहे.

फेसबुकचं लाइक काउंट हे फीचर अनेकांना आवडत नाही. अनेकदा पोस्ट केल्यानंतर फोटोला किती लाइक आणि कमेंट आल्या याकडं लक्ष असतं. फेसबुकच्या आधी इन्स्टाग्रामनं व्हिडिओ पाहणाऱयांची आणि लाइक करणाऱयांची संख्या इतरांना दाखवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. किमान सहा देशांमध्ये हा प्रयोग सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अकाउंट आहे त्यांनाच किती लाइक्स आहेत ते पाहता येईल.