|Friday, February 21, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. दि. 8 ते 14 सप्टेंबर 2019

मेष –

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. तुमचा आत्मविश्वास, मनोधैर्य टिकून राहिल. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. कोणत्याही माणसाच्या विश्वासाची नक्की खात्री करून घ्या. संसारात किरकोळ अडचण, वाद होईल. राजकीय, सामजिक कार्यात प्रतिष्ठा राहिल. जवळच्या लोकांचे बोलणे मनस्ताप देणारे ठरेल. विरूद्धलिंगी व्यक्तीपासून सावध रहा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. शेतकरी वर्गाने प्रसंग पाहून वागावे.


वृषभ

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. महत्वाची धंद्यातील कामे होतील. रविवारी धावपळ होईल. वाहन नीट चालवा. थकबाकी वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांची मर्जी राहील. लोकप्रियता मिळेल. घरातील कामे करुन घ्या. घर, जमिनीसंबंधी प्रश्न सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. लग्नाचा विचार घरात निघेल. शेतकरी मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकेल.


मिथुन

कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात अडचण येईल. धंद्यात क्षुल्लक वाद होईल. त्यानंतर सर्व सुरळीत होईल. नोकरीत वरिष्ठ खूष होतील असे काम कराल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धि, पैसा मिळेल. ओळखी वाढतील शेतीची कामे होतील. आप्तेष्ठ भेटतील.


कर्क

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. तुमचा प्रभाव त्या क्षेत्रात वाढेल. घरातील कामे होतील. नोकरीत वरिष्ठांना मदत कराल. राजकीय-सामाजिक कार्यात जोमाने वागून लोकांची कामे करा, मागील वाद, गैरसमज ठेऊ नका. सर्व मिटवा. अनंतचतुर्दशीच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करु नका. डोळ्यांची काळजी घ्या. शेतकरीवर्गाला दिलासा मिळेल.


सिंह

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. मंगळवार, बुधवारी वादाचा प्रसंग निर्माण होईल. प्रवासात वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखीचा उपयोग होईल. नोकरीत चांगले वातावरण राहिल. फळे,भाज्या यात शेतकऱयाला पैसा मिळेल.


कन्या

तुमच्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. थोडय़ा अडचणी कमी होतील. धंद्यात परिस्थिती सुधारेल. वाद जास्त वाढवू नका. दादागिरीची भाषा कुठेही उपयोगी येणार नाही. राजकीय-सामाजिक कार्यात नाव बिघडवू नका. गुरुवार, शुक्रवारी अपमानास्पद वागणूक मिळेल. नोकरीत, कामात दुर्लक्ष करु नका. मारामारीचा प्रसंग टाळा. स्पर्धेत नाराज होऊ नका. दुखापत संभवते.


तुला

 कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. महत्वाची कामे लवकर करून घ्या. घरात कामे वाढतील. क्षुल्लक मतभेद राहतील. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात रागावर ताबा ठेवा. कठोर बोलणे टाळा. राजकीय-सामाजिक कामात तुमचे महत्व राहिल. नोकरीत वरि÷ांच्या कामात सहकार्य करावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मैत्रीत वाद संभवतो. नोकर माणसांना सांभाळून ठेवा.


वृश्चिक

कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात चर्चा सफल होईल. मोठे काम मिळेल. नवीन ओळखी होतील. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करु शकाल. दौऱयात यश मिळेल. घरातील लोकांना खूष कराल. घर, जमीन संबंधी कामे करा. शेतकरी वर्गाला फायदा होण्याचे चिन्ह दिसेल. स्पर्धेत जिंकाल.


धनु

कन्या राशीत शुक्र, बुध, प्रवेश तुमच्या कार्याला मदत करणारा आहे. धंद्यात वाढ होईल. योग्य ठिकाणी पैसा गुंतवता येईल. घरातील, धंद्यातील कामे करून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात महत्वाचा निर्णय घेता येईल. वरि÷ कौतुक करतील. नोकरीतील समस्या सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. ओळखी वाढतील. पेमाला चालना देणारी घटना घडेल.


मकर

कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश, तुम्हाला दिलासा देणारा आहे. रविवारी रागाचा पारा वाढेल. सहनशीलता ठेवा. धंद्यात नवा विचार करुन प्रगतीची संधी शोधता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात तुम्हाला एकटे पाडून अपमानीत करण्याचा प्रयत्न होईल. मन खंबीर राहील. पण दादागिरी नको. लोकांचे प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत होईल. नोकरीत काम वाढेल. वाद होऊ शकतो. चूक करु नका.


कुंभ

कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश होत आहे. मंगळवार, बुधवारी तुमच्या विरोधात काही लोक बोलतील. राजकीय-सामाजिक कार्यात विघ्न निर्माण करतील. धंद्यात मतभेद होऊ शकतो. संसारात गैरसमज नाराजी होईल. नोकरमाणसे वेळेवर दगा देण्याची शक्यता आहे. कठोर बोलणे टाळा. मैत्रीत वाद होईल. कला- क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. आप्तेष्ठांच्यामध्ये तणाव होईल.


मीन

कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश तुम्हाला मदत करणारा ठरेल. गुरुवार, शुक्रवारी कोणताही निर्णय घेतांना घाई करु नका. समाजकार्यात सर्वांच्या मतानुसार वागा. हातघाईवर येऊ नका. राजकीय  कामात वरि÷ांची नाराजी होऊ शकते. नोकरीत, कामात चूक होईल. कला- क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. मोठे लोक आश्वासन देतील. वृद्ध व्यक्तींचा मान ठेवा.

Related posts: