|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राष्ट्रपतींच्या विमानालाही पाकिस्तानची नकारघंटा

राष्ट्रपतींच्या विमानालाही पाकिस्तानची नकारघंटा 

रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकच्या हवाई हद्दीत नाकारली परवानगी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱयावर जात आहेत. मात्र, या विदेश दौऱयावर जाताना आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास पाकिस्तानने नकार दिल्यामुळे आता त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असल्याने सध्या भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. राष्ट्रपतींच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास पाकिस्तानने परवानगी नाकारल्यामुळे दोन्ही देशांमधील तेढ आणखी वाढले आहे. तीन देशांच्या दौऱयावर जाणाऱया रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी मिळण्यासाठी भारताने विनंती केली होती. पण पाकिस्तानने भारताची विनंती फेटाळून लावली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली.

Related posts: