|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक बंदच!

वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक बंदच! 

कळेत पुराचे पाणी रस्त्यावर : चाकरमान्यांची मोठी गैरसोय

वार्ताहर / वैभववाडी:

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आठवडाभर पावसाने हाहाकार माजवला असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे करुळ आणि भुईबावडा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने गगनबावडा तालुक्मयातील मांडुकलीत कळे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर या महामार्गावरील  वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दरम्यान, कोकणातून कोल्हापूरकडे जाणारी वाहने फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहेत. वैभववाडी पोलिसांनी संभाजी चौकात बॅरिकेट्स लावून कोल्हापूरकडे जाणारी वाहने थांबवून फोंडाघाटमार्गे वळविली आहेत. वैभववाडी पोलिसांसह होमगार्ड दिवसभर संभाजी चौकात तैनात होते. करुळ घाटमार्गे वाहतूक बंद असल्याने गणपती उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मुंबई-कोल्हापूर-पुणेकडे जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग बंदच राहणार आहे.

Related posts: