|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटण, वाई मतदार संघासाठी रिपाइंचा आग्रह

फलटण, वाई मतदार संघासाठी रिपाइंचा आग्रह 

सन्मानपूर्वक जागा न मिळाव्यास रिपाइं स्वबळावर लढेल, मंत्री अविनाश महातेकर यांची माहिती

प्रतिनिधी/ सातारा

भाजप-सेना-रिपाइंची युती दृष्टीक्षेपात आहे. या पार्श्वभूमीवर आमचे नेते मंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंसाठी भाजपकडे 23 जागा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु त्या देणे शक्य न झाल्यास आम्ही 18 जागांपर्यंत खाली येवू शकतो, तसे न झाल्यास प्रसंगी आम्ही स्वबळावरही लढू, असा इशारा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मंत्री अविनाश महातेकर हे सातारा दौऱयावर आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील रिपाइंच्या भूमिकेबाबत बोलत होते.  महातेकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील परिस्थितीचा वेध घेवून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला असून योग्य आश्वासन दिले आहे. भाजपकडे विधानसभेच्या 23 जागांची आम्ही मागणी केली आहे. त्यातील 18 जागा देतील असा आम्हाला विश्वास आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ातून फलटण, वाई यांची मागणी केली आहे. भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांनी एकत्र येवून लढल्यास जास्त फायदा होणार आहे. शिवाय राज्यातील इतर लहान पक्षांनाही यांचा फायदा होणार आहे. वचित बहुजन आघाडी ही स्वबळांवर लढत असेल तर निर्णय चांगला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे.

  दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी रिपाइंच्या उमेदवांराना समान चिन्ह देण्याची मागणी केली आहे. असे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. हे मान्य झाल्यास रिपाइंचे सर्व उमेदवार एकाच चिन्हावर निवडणूक लढतील आणि निवडून येतील. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष रिपाइंचे तीन तरी उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल आश्वासन दिले आहे, असे मत मंत्री अविनाश महातेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जिल्हय़ातील फलटण व वाई मतदार संघ रिपाइंला सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी सांगितली.