|Saturday, February 22, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » इंटरनेट स्पीडमध्ये सिंगापूर जगात केंद्रस्थानी, भारत पिछाडीवर

इंटरनेट स्पीडमध्ये सिंगापूर जगात केंद्रस्थानी, भारत पिछाडीवर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगभरात मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये सिंगापूर जगात अव्वल ठरले आहे. भारत मात्र, पिछाडीवर आहे. Ookla या कंपनीने स्पीडटेस्ट ग्लोबल निर्देशांक रिपोर्टच्या आधारे ही माहिती दिली आहे.

जगात इंटरनेट स्पीडमध्ये 21.4 टक्क्मयांची तर ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये 37.4 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. सिंगापुरात ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये 5.6 टक्क्मयांची वाढ नोंदवली गेली आहे. भारत मात्र, या स्पीडच्या वेगाच्या सरासरीत मागेच आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट स्पीड सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात मोबाईलच्या वापरात 16.3 टक्क्मयांची वाढ तर ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये 28.5 टक्क्मयांची वाढ झाली आहे. मात्र, इंटरनेट स्पीडमध्ये भारत मागेच आहे.

Related posts: