|Friday, February 21, 2020
You are here: Home » leadingnews » अखेर… हर्षवर्धन पाटील उद्या करणार भाजपात प्रवेश

अखेर… हर्षवर्धन पाटील उद्या करणार भाजपात प्रवेश 

ऑनलाइन टीम / इंदापूर :

राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ व दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील उद्या, बुधवारी दुपारी 3 वाजता मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित असणार आहेत.

इंदापूर विधनसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. मागील विधनसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आगामी विधनसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता. मात्र, विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्वासघात गेला. आत्तापर्यंत आपण संयमाने वागलो मात्र यापुढील काळात आक्रमकपणा बघाच असा इशारा देत भाजप प्रवेशाचे संकेत मेळाव्यातच दिले होते.

 

Related posts: