|Saturday, September 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

14 पासून पितृपक्षाची सुरुवात पितरांचे स्मरण पूजन काळ

बुध. दि. 11 ते 17 सप्टेंबर 2019

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून पुढील 15 दिवस हे पितरांचे दिवस असतात. हा काळ सर्वसाधारणपणे अशुभ व बाधिक मानला जातो. त्यामुळे या पंधरवडय़ात कोणतीही शुभ कामे करीत नाहीत. वास्तविक हा तसा वाईट महिना नसतो. पितरांच्या कार्याला प्रथम प्राधान्य द्या व नंतर इतर कामाकडे लक्ष द्या, असा संदेश देणारा हा महिना आहे. ज्या घरात श्राद्ध कर्मे व्यवस्थित होत असतील तेथे पितरांचा आशीर्वाद मिळून सर्व तऱहेने कल्याण होते. या महिन्यात घराण्यातील सर्व पूर्वजांचे आत्मे भूतलावर असतात. आपले वंशज आपले स्मरण पूजन करतात की नाही हे ते अदृश्यरुपाने  पहात असतात. त्यामुळे आपल्याला शक्मय होईल तसे श्राद्ध करावे. शक्मयतो तज्ञ भटजींकडून करून घ्यावे. म्हणजे दोष रहात नाहीत. काही जण पितरांच्या शांतीसाठी हे द्या, ते द्या अन्यथा आम्ही जेवणार नाही व तुम्हाला पितरांचा शाप लागेल अशी भीती घालून लुबाडतात. अशा  लोकांना दाद देऊ नये व घाबरून जाऊ नये. अपघात, आजार, दुर्घटना, खून, मारामाऱया, दंगली, गोळीबार, विषप्रयोग, आत्महत्या यासह अनेक घटनात रोज कुणी ना कुणी जात असतात. त्या सर्व शुभ-अशुभ आत्म्यांचा संचार या पंधरवडय़ात पृथ्वीतलावर असतो. या पितृपक्षात अनोळखी लोकांच्या घरचे अन्न शक्मयतो खाऊ नये, ते बाधण्याची शक्मयता असते. काही तीर्थक्षेत्रावर शापीत दोषांची शांती करून अन्नदान करतात. त्यांच्याशी आपला काहीही संबंध नसेल तर ते अन्न ग्रहण करू नये. पितृपक्षात बाधिक अन्न घेतल्याने अनेक जणांना प्रखर बाधा झाल्याची व नंतर ते निस्तरताना नाकीनव आल्याचे अनेकजण नंतर बोलून दाखवित असतात. तुमच्याकडे जर अध्यात्मिक शक्ती नसेल अथवा बाधिक पीडा सहन करण्याची ताकत नसेल तर तुम्ही या महिन्यात सावध राहणे चांगले. 14 सप्टेंबरपासून सर्वपित्री अमावास्येपर्यंतचा काळ अतिशय निरुत्साही व सुतकी असतो. त्यामुळे या काळात वाहन वगैरे सांभाळून चालवावे. भांडण-तंटे वगैरेपासून दूर रहावे. काही घराण्यातील बाधा अतिशय कडक असतात, त्यामुळे या पितृपक्षात काही जणांचा राग अनावर होण्याची व त्यातून काही  तर भयानक दुर्घटना घडण्याची शक्मयता असते. पितृशाप, मातृशाप, भातृशाप, पत्नीशाप तसेच देवाधर्माच्या नावाखाली बळी दिल्याने मुक्मया प्राण्यांचा तळतळाट, सावकारी, बळजबरी, छळणूक, एखाद्याची अन्नान्नदशा करणे, काही तरी खोटेनाटे सांगून नोकरीवरून काढणे, पोटावर पाय आणणे, जागा व मालमत्ता बळकावणे, व्याजबटय़ाचा व्यवसाय, अपघाती मृत्यू, बदनामी, एखाद्याचा निष्कारण दुश्वास करणे, गळफास, विषप्रयोग, दरोडे, अग्निप्रलय, जलप्रलय, बॉम्बस्फोट, विषारी वायूने मृत्यू, यासह अनेक घटनांतून हजारो शाप निर्माण होतात. माणूस म्हटला की हे सारे प्रकार आलेच. ज्यानी हे केले त्यांची पुण्याई शिल्लक असेपर्यंत सर्व काही नीट चालते, पण वेळ फिरल्यावर पुढील पिढीस ते भोगावे लागते. अतृप्त आत्मे पिशाचरुपाने अंतराळात फिरत असतात. त्यामुळे सध्याच्या पिढीवर परिणाम होऊन त्यांची प्रगती होत नाही. पूर्वजांच्या हातून  काय अनिष्ट कृत्य घडले  आहे हे कळणे कठीण असते. तृप्त-अतृप्त अशा सर्व आत्मे या काळात भूतलावर अदृश्य रुपाने अवतरतात त्यांना शांत ठेवण्यासाठी या महिन्यात त्यांच्या नावाने श्राद्ध करावे. सर्वपित्री अमावास्या हा त्यांच्यासाठी अत्यंत योग्य दिवस आहे.

मेष

शनिवारपासून पितरांचा महालय मास सुरू होत आहे. जर तुमच्या वाडवडिलांची पुण्याई चांगली असेल तर याच महिन्यात तुमचे भाग्य उजळू शकेल. पण जर शापीत दोष असतील तर त्यांचाही त्रास होऊ शकेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नको त्या व्यक्तीकडून अपमानाचे प्रसंग. शारीरिक दुखापती होतील. पितृपक्षात दूरवरचे प्रवास टाळा. आर्थिक व्यवहार जपून करावेत.


वृषभ

पूर्वजांचा कारक ग्रह राहू धनस्थानी आहे. पूर्वजांचा पक्षमास सुरू होत आहे. आर्थिक बाबतीत जपून रहा. संततीच्या तक्रारी, आरोग्यात बिघाड, पितृपक्ष संततीच्या दृष्टीने त्रासदायक, त्यासाठी घरातील श्राद्धकर्मे नीट ठेवा. शापीत दोष असतील तर त्याचे निराकरण करा. त्यामुळे आर्थिक बाबतीत चांगले योग येतील. अनेक कामात मोठे यश.


मिथुन

तुमच्या राशीतच राहू आहे व पूर्वजांची मालकीही याच ग्रहाकडे आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे धाडस करताना सावध रहा. शारीरिक व मानसिक आघात होऊ शकतात. अनेक कामात मोठे यश मिळवून देईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. राहू- शनि अशुभ योग. पडझड, अपघात, वास्तूदुर्घटना कोर्टमॅटरचा त्रास यामुळे मनस्ताप.


कर्क

पूर्वजाकारकग्रह राहू व्ययस्थानी, त्यातच पितरांचा महालय मास सुरू होत आहे. हा शापीत योग आहे. पूर्वजांची श्राद्धकर्मे नीट ठेवल्यास घरगुती सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष द्याल. स्वत:ची वास्तू असावी, वाहन असावे, ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. प्रेमप्रकरणामुळे कडाक्मयाचे वादविवाद होतील. कुणाशीही निष्कारण वाईटपणा घेऊ नका.


सिंह

लाभस्थानावर पितृपक्षाचा शुभ प्रभाव आहे. काही तरी शुभ घडेल, तसेच अनेक मार्गाने बहुविध लाभ होण्याचे योग. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. रात्रीपेक्षा दिवसा तुम्ही जे काम कराल ते हमखास होईल. मेष, कर्क, धनु, मिथुन, कन्या या राशीबरोबर तुम्ही कोणतेही व्यवहार कराल. निश्चित यशस्वी व्हाल. चोरांपासून भय असल्याने सांभाळावे. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात… अग्नीभय असल्याने जपून राहावे.


कन्या

पितृपक्षाची मालकी असणारी रास. त्यातच घातमहिना. त्यामुळे काही बाबतीत सांभाळून रहाणे योग्य. कफ व पित्त यांचा त्रास होईल. मित्र, मैत्रिणी व नातेवाईकांपासून धोका होऊ शकतो, सांभाळा. पाठीवर भावंडे होण्याचे योग. अपघाताचे भय राहील. प्रवासात अपघात. जपावे लागेल. घरदाराच्या बाबतीत आपण अत्यंत भाग्यवान ठरणार आहात.


तुळ

पितृपक्षाची सुरुवात भाग्यस्थानातून होत आहे. पूर्वजांचे पुण्य चांगले असल्यास. मंगल कार्यातील अडचणी कमी होतील. अनेक कामे अपेक्षापेक्षा लवकर होतील. तर सर्व कामात हमखास यश. श्रीमंती राहणी, उच्च विचारसरणी, तसेच लक्ष्मी व सरस्वतीची कृपा यादृष्टीने भाग्यवान ठरेल. मनात जे आणाल ते साध्य होईल. पण उंच घरे, डोंगर, भिंती, छप्पर, स्लॅब यावरून पडण्याचा धोका आहे.


वृश्चिक

अष्टमस्थानावर पितृपक्षाचा प्रभाव आहे. या 15 दिवसात वाहन जपून चालवा. अनोळखी लोकांच्या हातचे खाऊ नका. तसेच बाधिक ठिकाणे टाळण्याचा प्रयत्न करा. पण कोणत्याही शुभ व  सात्विक व्यवहारात हमखास यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काही ना काही तक्रार राहील. रक्तासंबंधीचे व कडकीचे विकार होतील. अत्यंत जवळचे मित्र, मैत्रिणी घात करतील.


धनु

विवाहस्थानावर पितृपक्षाचा प्रभाव आहे. पूर्वजांची श्राद्धकर्मे नीट ठेवल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. घरदार, इस्टेट या दृष्टीने भाग्यवान ठराल. स्वत:चे घर होईल. संततीसौख्य मध्यम. मंगळ उत्तम स्थितीत असल्याने काहीवेळा अचानक मान-सन्मान होण्याचे योग. आंतरजातीय व्यक्तीशी वैवाहिक संबंध जुळतील.


मकर

सहाव्या स्थानावर राहू व त्याच स्थानावर पितृपक्षाचा प्रभाव आहे. अडलेली कामे होऊ लागतील. आर्थिक लाभाच्या घटना. नोकरीत बढती व संसारात सौख्य लाभून कोर्ट दरबारात यश. उजवा कान दुखणे, पांथरी, स्मरणशक्ती बिघडणे, हिवताप, वेडेपणा, ताप, कॅन्सर, खोकला, दमा, क्षय, बहिरेपणा, हॉर्निया, संधीवात यांचा त्रास होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.


कुंभ

पंचमस्थानावर पितृपक्षाचा प्रभाव आहे. शापीत योग. पूर्वज शांत नसतील तर या पक्षमासात त्याचा त्रास होऊ शकतो. पण इतर बाबतीत चांगले योग. काही नको असणाऱया व्यक्ती, मित्रमंडळी, तुमच्यासाठी वाटेल ते करू शकतील. आरोग्याच्या बाबतीत उचक्मया येणे, वातविकार, सूज येणे, घोटे दुखणे, फ्रॅक्चर होणे, पायात, खांद्यात लचक भरणे, डोळे दुखणे असे अनुभव येतील.


मीन

चतुर्थ स्थानावर पितृक्षाचा प्रभाव आहे. चोरी वगैरे आरोप येण्याची शक्मयता. महत्त्वाचे काम करा, फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत पाठीचे विकार, हृदयविकार, उष्माघात, मूर्च्छा, मोठे ताप, आपस्मार, रक्तदाब, स्नायूंचे विकार अनुवंशिक दोष, दृष्टीदोष, यांचा त्रास जाणवेल. पण नोकरी व्यवसायात उत्तम यश. बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर यश मिळेल.