|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » झोपडपट्टीकार्ड, घरफाळा सुरु करा

झोपडपट्टीकार्ड, घरफाळा सुरु करा 

स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाची महापालिकेसमोर निदर्शने

प्रतिनिधी/ कोल्हापूर

उचगांव नाका, टेंबलाईवाडी येथील गट नंबर 5 अ-1-अ पैकी झोपडपट्टीस छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर असे नामांतर करावे. तसेच झोपडपट्टीना घरफाळा सुरु करावा. झोपडीकार्ड द्यावे या मागणीसाठी परिसरातील नागरीकांसह स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्यावतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.

 आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासन निर्णयानुसार पात्र झोपडीची उंची 14 फुट वाढविण्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित महापालिकेना दिले आहेत. तसेच साडेचार ऐवजी नऊ इंच रुंदीच्या बांधकामास परवानगी दिली आहे. असे असतानाही मनपाच्या संबंधित अधिकार व उपशहर अभियंता यांनी जाणून बुजून बांधकाम परवानगी दिली जात नाही.  झोपडपट्टीना खासगी स्वरुप देण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाचा सुरु आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरात सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशाराही देण्यात आला. यावेळी धनाजी सकटे, केशव लोखंडे, राजन पिडाळकरप्रगती चव्हाण, प्रफुल्ल कांबळे, अश्विनी नाईक, संभाजी लोखंडे उपस्थित होते.

Related posts: