|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोखले महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

गोखले महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात 

कोल्हापूर

      गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ईश्वरी नाईक या विद्यार्थीनीने केले. प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आहे.Z

       यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. यावेळी अनुक्रमे रामचंद्र काळे, दिपाली पाटील, स्वालिया सरकवास, जागती डांगे, विवेकानंद पाटील, संकेत जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

      प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांच्या हस्ते हिरवळ भित्तीपत्रकांतर्गत इंग्रजी भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापूर परिस्थितीवर आधारित छायाचित्रे व माहिती उल्लेखनीयरित्या सादर करण्यात आली.

           प्र. प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांनी बोलताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मौलीक विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विविध उपक्रमात सहभागी होऊन विविधांगी गुण आत्मसात करुन वाटचाल केल्यास भविष्यकाळ उज्ज्वल राहील, असे मत व्यक्त केले.

      यावेळी अंध विद्यार्थी रोहन लाखे यांने गीत सादर करुन वाहवा मिळवली. या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी प्रा. डॉ. मजिरी देसाई-मोरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

              सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओंकार जाधव, सागर पाटील, संजिवनी पाटील, सोनाली पवार, अनिता पाटील, वैभव भोलसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क. ईश्वरी नाईक हिने केले. आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सी. आर. चौगुले यांनी मानले.

Related posts: