|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित ऍड. उपाध्येचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित ऍड. उपाध्येचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला 

इचलकरंजी जिल्हा न्यायालयात सोमवारी झाली सुनावणी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

इचलकरंजी येथील नगरसेवक व गुंड संजय तेलनाडे, त्याचा भाऊ व गुंड सुनिल तेलनाडे, ऍड. पवनकुमार उपाध्ये, त्याचा मित्र प्रशांत होगाडे आदीनी एका तरुणीवर दहशत निर्माण करुन सामुदायिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात अटकपूर्व जामिन मिळावा. याकरीता याप्रकरणातील संशयीत आरोपी ऍंड. पवनकुमार उपाध्ये याने इचलकरंजी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने सोमवारी (9 सष्टेंबर) फेटाळून लावला.

   या सामुदायिक प्रकरणी पोलिसांनी प्रशांत होगाडेला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी कोल्हापूरातील कारागृहात करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून इचलकरंजी परिसरातील एसटी सरकार टोळीचा मुख्य म्होरक्या गुंड संजय तेलनाडे, त्याचा भाऊ गुंड सुनिल तेलनाडे आणि टोळीचा मास्टर माईड ऍड. उपाध्ये हे तिघे पसार आहेत. यासर्वानी या गुह्यात अटकपूर्व जामिन मिळावा. यासाठी या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या दाखल अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणीअंती फेटाळून लावला. त्यामुळे या गुह्यातील संशयीत आरोपी ऍड. उपाध्येने इचलकरंजी न्यायालयात गेल्या महिन्यात अटकपूर्व जामिन मिळावा. याकरीता अर्ज केला होता. या अर्जावर आरोपी अँड. उपाध्येचे वकील आणि सरकारी वकीलानी जोरदार युक्तीवाद केला. या युक्तीवादानंतर ऍड. उपाध्येचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

   तर ऍड. उपाध्येला जिल्हा सत्र न्यायालयाने एका फसवणूकीच्या गुह्यत अटकपूर्व जामिन नुकताच मंजुर केला होता. पण अटकपूर्व जामिन अर्ज मंजुरी करताना न्यायालयाने त्याला पोलीस ठाण्यात हजेरी देण्यास हजर राहण्याबातच्या काही अटी व काही शर्थी लावल्या होत्या. तरीदेखील अँड. उपाध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलीस ठाण्यात हजेरीकरीता आतापर्यत एकदाही हजर राहिला नाही.  त्यामुळे त्याने न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्याचा त्या फसवणूक प्रकरणातील मिळालेला अटकपूर्व अर्ज रद्द करणार, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली. 

गुंड तेलनाडे बंधूसह अँड. उपाध्ये अद्यापी पसार

गुंड तेलनाडे बंधूसह अँड. उपाध्ये आणि त्याच्या एसटी सरकार गँगविरोधी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी एक नव्हे डब्बल मोक्यातंर्गत कारवाई केली आहे. या तिघासह त्याचे काही साथिदार गेल्या तीन महिन्यापासून पसार आहेत. पोलीस त्याचा शोद घेत आहेत. पण तेसर्व जण अद्यापी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत. 

 

 

 

Related posts: