|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » मराठी माणसांनी मला संघर्षाच्या काळात साथ दिली : जितेंद्र

मराठी माणसांनी मला संघर्षाच्या काळात साथ दिली : जितेंद्र 

पुणे / प्रतिनिधी : 

माझा जन्म पंजाबमध्ये झाला, परंतु सर्व आयुष्य मी मुंबईतील गिरगावात घालविले. तेथील मराठी माणसांनी मला संघर्षाच्या काळात साथ दिली. आजही मी पंजाबीपोक्षा मराठी चांगले बोलतो. मराठी माणसांनी केलेल्या प्रेमामुळेच मी मोठा होऊ शकलो अशी भावना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्पेझ्र् आयोजित सांस्कृतिक कट्टा या कार्यक्रमात जितेंद्र यांनी आपला जीवनपट उलगडला. पत्रकार संघाचे संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी, श्री छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

जितेंद्र म्हणाले, मराठी माणसांकडून मी खूप शिकलो. आयुष्याची पहिली 19 वर्ष मी चाळीत मराठी माणसांबरोबरच वाढलो. शिक्षण आणि अभिनय येत नसतानाही व्हि शांताराम यांनी ला संधी दिली. माझे खरे वडील जरी वेगळे असले तरी जितेंद्र ला जन्म शांताराम बापूंनीच दिला.

गणेशोत्सवाच्या होणाऱया व्यवसायिकरणासंदर्भात ते म्हणाले, आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. फक्त तो बदल चांगल्या कारणासाठी झाला पाहिजे. गणेशोत्सवामध्ये आता पैशाचा अधिक वापर होत आहे, परंतु त्यामुहे चार लोकांना जर रोजगार मिळत असेल तर त्यात वाई काहीच नाही. मी आजही आमच्या चाळीतील गणपतीची दरवषी आरती करतो. माझ्याकडे जे आहे ते लोकाचे प्रेम आणि गणपतीच्या आशिर्वादामुळेच आहे.

गणेशोत्सवाचे दहा दिवस हे माझ्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचे आणि आनंदाचे दिवस होते आणि आजही आहेत. माझ्या लहानपणी जरी गरिब असलो तरी गणेशोत्सवाच्या काळात मी लोकांच्या मनाची श्रीमंती अनुभवली आणि त्या संस्कारातूनच आजही मोठा झाला आहे असेही जितेंद्र यांनी यावेळी सांगितले.

 

Related posts: