|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीच्या तिकीट विक्रीस प्रारंभ

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीच्या तिकीट विक्रीस प्रारंभ 

पुणे / प्रतिनिधी 

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान कसोटी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याच्या तिकीट विक्रीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

येत्या 15 सप्टेंबरपासून दक्षिण अफ्रिकेच्या भारत दौऱयाला सुरुवात होणार आहे. या दौऱयात तीन टी-20 आणि तीन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील दुसरी कसोटी पुण्यातील एमसीएच्या मैदानावर होणार आहे. पुण्यात जवळपास एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येत आहे. या सामन्याची सिझन तिकीटे www.bookmyshow.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सामन्याची प्रत्यक्ष तिकिट विक्री 25 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. याबरोबरच दर दिवशीची तिकिटेदेखील या वेळी उपलब्ध करून देण्यात येतील.

कसोटी सामन्याचे तिकीट दर पुढीलप्रमाणे : 

ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँड सिझन तिकीट 1000/- व प्रत्येक दिवसाचे 400/-, साऊथ अप्पर सिझन तिकीट 1500/- व दिवसाचे 600/-, साऊथ लोअर सिझन 2500/- व दिवसाचे 1000/-, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँड सिझन 2000/- व दिवसाचे 800/-, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँड सिझन 2000/- व दिवसाचे 800/-, नॉर्थ स्टँड सिझन 2500/- व दिवसाचे 1000/-, साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँड सिझन 5000/- व दिवसाचे 2000/-, कॉर्पोरेट बॉक्सचे सिझन 62,500/- व दिवसाचे 50 हजार रुपये इतके आहे.

मागील वर्षी 27 ऑक्टोबरला भारत विरूद्ध वेस्टइंडिज यांच्यात एकदिवसीय सामन्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या आधी 2017 मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना हा एमसीए मैदानावरील पहिला कसोटी सामना होता. आता 2 वर्षे 7 महिने 13 दिवसानंतर पुन्हा पुण्यात कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

 

Related posts: