|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » क्रिकेट सामन्यांचे रेडिओवरही थेट समालोचन

क्रिकेट सामन्यांचे रेडिओवरही थेट समालोचन 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑल इंडिया रेडिओशी आपण दोन वर्षांचा करार केला असल्याचे मंगळवारी जाहीर केले. भारताचे आंतरराष्ट्रीय सामने, तसेच देशांतगर्त प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धांसाठी हा करार केला गेला. यामुळे, येत्या दोन वर्षात ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) या स्पर्धांचे थेट समालोचन करणार असल्याचे स्पष्ट झाले.

या महत्त्वाकांक्षी करारामुळे भारतातील कानाकोपऱयातही लक्षावधी चाहत्यांना अगदी रेडिओ समालोचनाच्या माध्यमातूनही क्रिकेटचा आनंद लुटता येईल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दि. 15 सप्टेंबर रोजी धरमशाला येथे पहिली टी-20 लढत होईल. या लढतीच्या माध्यमातून श्राव्य समालोचनाला रेडिओवरुन सुरुवात होणार आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांबरोबरच ऑल इंडिया रेडिओ पुरुष व महिलांचे देशांतर्गत स्पर्धेतील सामन्यांचे समालोचनही प्रसारित करेल. दि. 10 सप्टेंबर 2019 ते 31 ऑगस्ट 2021 हा रेडिओशी केलेल्या कराराचा कालावधी असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी चषक, इराणी चषक, देवधर चषक, सय्यद मुश्ताक अली चषक व महिला चॅलेंजर चषक स्पर्धेचे धावते समालोचनही रेडिओवर प्रसारित केले जाणार आहे.

Related posts: