|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपई पोलीस ,प्रशिक्षण केंद्रातील गणेश बांप्पाना उत्साही वातावरणात निरोप

वाळपई पोलीस ,प्रशिक्षण केंद्रातील गणेश बांप्पाना उत्साही वातावरणात निरोप 

वाळपई प्रतिनिधी

 नऊ दिवसाच्या उत्साही व अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर आज वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र व वाळपई पोलिस स्थानकाच्या गणेश बाप्पांना उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थित होती. गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही गणेश बाप्पांचे नऊ दिवस पूजन करण्यात येत असते. अशाच प्रकारे वेगवेगळय़ा कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. नऊ दिवसीय विसर्जन सोहळय़ास नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

यावेळी खास दि?डीचे आयोजन करण्यात आले होते .विसर्जन मिरवणूक संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आली. सदर मिरवणूक वाळपईच्या मध्यवर्ती परिसरात  पोहोचल्यानंतर ठाणे रस्त्यावरून गोवा बागायतदारकडे घेण्यात आली व पुन्हा फातिमा कॉन्व्हे?ट शाळेकडून वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आली. यावेळी दारूकामाची आतषबाजी करण्यात आली. मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या दि?डी पथकामध्ये पारंपरिकता आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. वेगवेगळय़ा प्रकारची संत रचना व गणेश बाप्पाचे भजन करीत हा सोहळा चांगल्याप्रकारे पार पडला। शेवटी उशिरा मासोर्डे येथील विसर्जन स्थळावथ गणेश बापाला उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला.

 याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वाळपई पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सांगितले की गेल्या नऊ दिवसांपासून वाळपई पोलीस स्थानकावर चांगल्या प्रकारे नागरिकांनी हजेरी लावून गणेश बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे  भागातील नागरिक व पोलीस स्थानकावरील कर्मचारी व अधिकारी यांच्या दरम्यान एक प्रकारचा वेगळय़ा प्रकारचा संवाद साधण्याचा करण्यात आलेल्या प्रयत्न करीत बाप्पाच्या रुपाने यशस्वी झाल्याचे.

Related posts: