|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा-कर्नाटक मुख्यमंत्र्याची पुढील आठवडय़ात बैठक

गोवा-कर्नाटक मुख्यमंत्र्याची पुढील आठवडय़ात बैठक 

प्रतिनिधी/ पणजी

केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हादईसंदर्भात सामंजस्याने तोडगा काढण्याचे विधान करताच आता कर्नाटकाच्या हाती नवे कोलीत सापडले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुढील आठवडय़ात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करण्याची तयारी चालविली आहे.

म्हादई पाणी वाटपासंदर्भातला मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हादई संदर्भात विधान करताच कर्नाटकात हालचाली सुरु झाल्या आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  यांच्यशी संपर्क साधून भेटीबाबत चर्चा केली. पुढील आठवडय़ात कदाचित 16 किंवा 17 रोजी या दोन्ही मुख्यमंत्र्यादरम्यान बैठक होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्री कार्यालयातून गोवा मुख्यमंत्री कार्यालयाशी कालच संपर्क साधून या भेटीबाबत चर्चा करण्यात आली आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुराप्पा 16 किंवा 17 रोजी गोव्यात येतील. यावेळी ही चर्चा होणार आहे.

कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यामध्ये सध्या भाजपची सरकारे आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी चर्चेद्वारे तोडगा काढावा, असे प्रयत्न आता सुरु झाले आहेत. दोन्ही राज्ये म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गोव्याचा बराच भाग व वनक्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गोव्याच्या दृष्टीने म्हादईचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.

Related posts: