|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मांसविक्री निर्बंध निर्णयाविरोधात व्यावसायिक एकवटले

मांसविक्री निर्बंध निर्णयाविरोधात व्यावसायिक एकवटले 

जिल्हाधिकाऱयांना आज निवेदन देणार असल्याची माहिती

वार्ताहर/ सांबरा

सांबरा विमानतळाच्या 10 किमी हद्दीमधील मांसविक्री करण्यावर निर्बंध घातल्याने अनेकांवर बेकारीचे सावट पसरले आहे. त्यामुळे पूर्वभागातील सर्व व्यावसायिक एकवटले असून या निर्णयाविरोधात जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचे मंगळवारी सांबरा येथे झालेल्या बैठकीत ठरविले.

जिल्हाधिकाऱयांच्या आदेशामुळे याभागातील चिकन व मटणाची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. निलजी ते सुळेभावीपर्यंत सुमारे 70 दुकाने असून या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. या भागातील निम्म्याहून अधिकजण मांसाहारी आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या या अजब आदेशामुळे पूर्वभागात खळबळ  माजली आहे.

मंगळवारी सांबरा येथे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा केली. बैठकीत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन मांस विक्रीवरील बंदी उठविण्याची मागणी करण्यात येण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीस चंद्रकांत  ताडे, मोहन ताडे, प्रवीण ताडे, शुभम ताडे, लालसाब हलिमा इरफान डिशान, उमेश पासलकर, गोपी ताडे, नेताजी कांबळे, प्रकाश भोपळे, पिंटू कांबळे, अरिफ बेपारी, नौशाद मुजावर, इरफान बेपारी यांच्यासह व्यावसायिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.