|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा पोलीस यंत्रणेकडून आढावा

शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा पोलीस यंत्रणेकडून आढावा 

बेळगाव / प्रतिनिधी

श्री विसर्जनाचा सोहळा गुरूवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या व्यवस्थेच्या नियोजनावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी रात्री सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

शहराच्या मध्यवर्ती भागातील संवेदनशील परिसरात फेरफटका मारून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यावेळी वरि÷ पोलीस अधिकारी वर्ग या पाहणी दौऱयात सहभागी झाला होता.