|Friday, February 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुक्केरीत लॉजवर लष्करी जवानाची आत्महत्या

हुक्केरीत लॉजवर लष्करी जवानाची आत्महत्या 

प्रतिनिधी/ संकेश्वर

कोण्णूर (ता. गोकाक) येथील लष्करी सेवेतील जवानाने सोमवारी हुक्केरीच्या रामकृष्ण लॉजवरील खोलीत फॅनला कपडय़ाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रात्री उघडकीस आल्याने हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व त्याचे पार्थिव रात्री उशिरा नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

प्रमोद दऱयाप्पा कडहट्टी (वय 32 रा. कोण्णूर) असे मृत जवानाचे नाव आहे. मृत प्रमोद हा गणेश उत्सवासाठी सुटीवर आला होता. तो सोमवारी रामकृष्ण लॉजवर एक रुम भाडय़ाने घेऊन थांबला होता. सायंकाळी रुम स्वच्छता करण्यास गेलेल्या कामगाराने रुमचे दार ठोठावले असता आतूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने ही माहिती लॉज मालकाला दिली. मालकाने याची माहिती हुक्केरी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने लॉजला भेट देऊन त्या रुमचा दरवाजा कटावणीने काढून पाहताच सदर जवानाने रुमच्या फॅनला कपडय़ाच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

लॉजवर दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा तरुण सैनिक असल्याचे उघडकीस आले आहे. मृत प्रमोद हा जम्मू येथे सेवा बजावत होता. तो सुट्टी घेऊन आपल्या गावी आला होता. प्रमोद विवाहित होता. त्याने नैराश्येतूनच आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.. या घटनेची नोंद हुक्केरी पोलिसात झाली आहे.

Related posts: