|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सदलग्याच्या प्रसिद्ध मोहरमची सांगता

सदलग्याच्या प्रसिद्ध मोहरमची सांगता 

वार्ताहर/   सदलगा

येथे प्रसिद्ध असलेल्या मोहरमची ताबूत विसर्जन करुन सांगता करण्यात आली. खोबरे, खारीक व अबीरच्या उधळणीत वाद्यांच्या गजरात लहान वेस, मोठी वेस, गांधी चौक, दर्गा चौक, चावडी गल्ली, जुना बाजारपेठ आदी भागात ताबूत भेटीचा क्षण पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती. तसेच हजरत खाँजा दर्ग्यामध्ये नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

येथील मोहरम हा प्रसिद्ध असून यात हिंदू बांधवांचा सहभाग मोठा असतो. यातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन होते. यामुळेच सदलगा येथे मोहरमला अधिक महत्त्व आहे. पारंपरिक पद्धतीने पीरपंजे विसर्जनाने मोहरमची सांगता झाली. यंदा शहरात जवळपास 200 ठिकाणी पंजे बसविण्यात आले होते. कत्तलरात्र दिवशी परंपरेनुसार पीरपंजास भाकरी, मलिदाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. येथील दर्ग्यात निखाऱयावरुन अनवाणी पायाने जाऊन अनेकजणांनी नवस फेडला. यावेळी सदलगा परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.

Related posts: