|Monday, January 27, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ऍपल 11 सिरिजचे 3 स्मार्टफोन लाँच

ऍपल 11 सिरिजचे 3 स्मार्टफोन लाँच 

 ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘ऍपल’ने 11 सिरिजचे त्याधुनिक आणि तितकेच सुरक्षित स्मार्टफोन मंगळवारी रात्री लाँच केले. आयफोन 11, 11 प्रो आणि 11 प्रो-मॅक्स अशी या स्मार्टफोनची नावे आहेत. भारतात 13 सप्टेंबरपासून या फोनची प्री बुकिंग सुरू होणार आहे. तर 20 सप्टेंबरला हा फोन ग्राहकांना मिळू शकतो.

ऍपल 11 पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.1 इंचाची एलसीडी आयपीएस एचडी स्क्रीन असेल. कंपनीने या फोनमध्ये 13 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. तसेच दोन रिअर कॅमेरे, 12 एमपीचा नाइट मोड कॅमेरा, डॉल्बी आवाज, फोर-के, स्लो मोशनची सुविधा, दोन मीटरपर्यंत पाण्यात चालू राहणारा, वायफाय 6 ची सुविधा यामध्ये आहे. तर 11 प्रो व 11 प्रो मॅक्स हे फोन 5.8 व 6.5 इंचामध्ये असतील. यामध्ये आयफोन 11 चे सर्व तंत्रज्ञान असेलच, शिवाय ओलेड, पी3 तंत्र असेल. सुपर रॅटिना एचडीआर डिस्प्लेचीही अत्याधुनिक सुविधा यामध्ये असेल. हे दोन्ही मॉडेल मिडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिव्हर व गोल्ड रंगांत येतील.

ऍपल 11 ची भारतातील किंमत अंदाजे 64 हजार रुपये असेल हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 128 जीबीमध्ये उपलब्ध असेल. ऍपल 11 प्रो (128 जीबी इंटरनल स्टोरेज) ची किंमत 99 हजार 900 रुपये तर ऍपल 11 प्रो मॅक्स (128 जीबी इंटरनल स्टोरेज) ची किंमत 1 लाख 9 हजार 900 रुपयांपर्यंत आहे.

Related posts: