|Thursday, September 19, 2019
You are here: Home » leadingnews » आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मुलासह नजरकैदेत

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मुलासह नजरकैदेत 

ऑनलाईन टीम / हैद्राबाद : 

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश नायडू यांना आंध्रप्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे.

आंध्रप्रदेश सरकार विरोधात चंद्राबाबू यांनी त्यांच्या तेलुगू देसम पार्टीने पक्षकार्यकर्ते आणि नेत्यांसह गुंटूर जिह्यात आज चलो ‘आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन केले होते. आंध्र सरकारने या रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा केली. त्यानंतर आंध्र सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे.

वायएसआरसीपी सरकार राजकीय हिंसाचार करत असल्याच्या विरोधात चंद्राबाबूंनी ही रॅली काढण्याच्या निर्णय घेतला होता. चंद्राबाबू या रॅलीसाठी आज सकाळी 9 वाजता घराबाहेर निघणार होते. त्यावेळी त्यांना रोखण्यात आले. यानंतर त्यांनी आपल्या घरीच उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह मुलगा लोकेशला त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले. त्यानंतर पोलिसांनी नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम 144 लागू करत जमावबंदी लागू केली.