|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘दबंग 3’ : स्वागत नही करोगे हमारा…

‘दबंग 3’ : स्वागत नही करोगे हमारा… 

ऑनलाइन टीम /मुंबई :

‘स्वागत नही करोगे हमारा…’ असे म्हणतं बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची दबंगगिरी चाहत्यांना लवकरच अनुभवता येणार. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना चाहत्यांनी चांगलेच डोक्मयावर घेतले होते. सलमान सध्या ‘दबंग 3’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तरी वेळात वेळ काढून त्याने चित्रपटाचा अधिकृत मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे. खुद्द सलमान त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.

चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करत त्याने कॅप्शनमध्ये ‘100 दिवसांनंतर चुलबूल रॉबिन हुड पांडे..’ असे लिहिले आहे. म्हणजे 100 दिवसांनंतर ‘दबंग ३’ चित्रपटगृहात येणार आहे. चित्रपटच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘दबंग-३’ चित्रपट 20 डिसेंबर 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Related posts: