|Friday, January 24, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत केली तृतीयपंथीयांनी श्री ची आरती

अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत केली तृतीयपंथीयांनी श्री ची आरती 

पुणे / प्रतिनिधी : 

सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या 127 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टमधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related posts: