|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » देशातील पहिल्या बीएस-6 ‘ऍक्टिवा-125’ ची विक्री सुरु

देशातील पहिल्या बीएस-6 ‘ऍक्टिवा-125’ ची विक्री सुरु 

किंमत 67,490 रुपयांपासून 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील बीएस-6 उत्सर्जन नियमावलीचे पालन करणाऱया ऍक्टिवा 125 या दुचाकीची विक्री बुधवारपासून सुरु करण्यात आली असून या दुचाकीचे सादरीकरण स्कूटर होंडा मोटारसायकल ऍण्ड स्कूटर इंडिया यांच्याकडून करण्यात आले आहे.  दिल्ली येथे शोरुम किंमत 67,490 रुपयापासून सुरु असल्याची माहिती कंपनीने दिली.

देशभरात बीएस-6 हा वाहन उत्सर्जन मानांकन एप्रिल 2020 पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे  आगामी काळातील दुचाकी व चार चाकी वाहनांचे मानांकन बीएस-6 असणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे ऍक्टिवा-125 ही बीएस असणारी पहिलीच दुचाकी ठरली आहे.  तीचे कंपनीने 12 जून रोजी प्रथम सादरीकरण केले होते.

तीन मॉडेलमध्ये सादर

ऍक्टिवा-125 दुचाकी स्टॅडर्ड, अलॉय आणि डीलक्स या तीन मॉडेलमध्ये सादर केली आहे. त्यांच्या अनुक्रमे किंमती 67,490 रुपये, 70,990 रुपये आणि 74,490 रुपये अशा ठेवण्यात आल्या आहेत. 

नवीन मॉडेल

जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेल आकाराने मोठे आहे. यात 36 मिलीमीटर लांब आाrण तीन मिलीमीटर रुंद असून 19 मिलीमीटर उंच आहे.

Related posts: