|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » केसरकरांच्या जादूटोण्याबाबत साळगांवकरांमुळे शिक्कामोर्तब!

केसरकरांच्या जादूटोण्याबाबत साळगांवकरांमुळे शिक्कामोर्तब! 

आमदार नीतेश राणे यांची पालकमंत्री केसरकरांवर टीका

वार्ताहर / कणकवली:

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याबाबतीत जादूटोणा या विषयावर अनेकदा ऐकले होते. मात्र, त्यांचे निकटवर्तीय असलेले नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीच याबाबत भाष्य केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले, असे म्हणायला हवे. जादूटोणा या विषयावर विश्वास ठेवून जर राजकारण चालत असते तर लोकशाहीवर किती विश्वास ठेवायचा? जादूटोण्यावर सर्व चालले असते तर विकासकामे करण्याचीही गरज नव्हती, असे आमदार नीतेश राणे यांनी येथे सांगितले.

येथे पत्रकार परिषदेत श्री. राणे म्हणाले, पालकमंत्र्यांच्या गाडीतून फिरणाऱया श्री. साळगावकर यांनी हे आरोप केल्याने त्यांना यातील निश्चितच माहिती असणार व ते कदाचित सत्यच बोलले असणार. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत जनतेत वेगळे चित्र दाखवले जात असले तरी श्री. साळगावकर यांच्या टिकेतून जनतेने बोध घेण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पालकमंत्र्यंनी या चिमण्यांनो परत या अशी हाक दिली. मात्र, पालकमंत्र्यांसोबतचा बगळाच जर बाजूला गेला तर चिमण्या परत कशा येणार?

पालकमंत्र्यांनी टीका करताना नाव न घेता नीतेश राणेंच्या सांगण्यावरून श्री.  साळगावकर बोलत असलेल्या केलेल्या आरोपाला श्री. राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, श्री. साळगावकर हे राजकारणात मी सांगून बोलण्याएवढे नक्कीच लहान नाहीत. पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावावर जनतेचा विश्वास मिळवीत असल्याचे भाष्य केले. पण अगोदर तुमच्या सहकाऱयाचा विश्वास मिळवा, नंतर जनतेचा विश्वास मिळवा.

मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार!

भाजप प्रवेशाबाबत श्री. राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी छोटा कार्यकर्ता आहे. पक्ष प्रवेशाबाबत नारायण राणे यांनाच विचारा. मात्र, येते दोन दिवस जिह्यासाठी महत्वाचे आहेत. मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात येतात ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. मी त्यांचे निश्चितच स्वागत करेन.’ मात्र तुम्हाला भाजपकडून निमंत्रण आले आहे का, या प्रश्नावर ‘निमंत्रण आल्यास तुम्हाला नक्कीच कळवेन’ असे श्री. राणे म्हणाले.

Related posts: