|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विधानसभेसाठी शिवसेनेकडून माने, कोठे, ठोंगे-पाटील यांनी दिल्या मुलाखती

विधानसभेसाठी शिवसेनेकडून माने, कोठे, ठोंगे-पाटील यांनी दिल्या मुलाखती 

प्रतिनिधी/ सोलापूर

आगामी विधानसभेसाठी मुंबईतील दादरच्या शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या मुलाखतीत सोलापुरातील विरोधी पक्षनेते महेश कोठे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, नगरसेवक मनोज शेजवाल, जि. प. सदस्य अमर पाटील या दिग्गजांनी सहभाग घेत मुलाखती दिल्या. बुधवारी दिवसभर दादर येथे खलबते झाले.

    आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान बुधवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे डॉ. मनिषा कावडे, डॉ. श्रीकांत शिंदे, प्रकाश फातपेकीकर, विश्वनाथ नेरुरकर, अमोल किर्तीकर, वरूण देसाई यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. यावेळी सोलापुरातून शिवसेनेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. 

          हे आहेत इच्छूक उमेदवार

सोलापुरातील शहर मध्यसाठी माजी आमदार दिलीप माने, अस्मिता गायकवाड, विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी मुलाखती दिल्या, तर करमाळा विधानसभेसाठी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल-कोलते, माढामधून शिवाजी सावंत, दक्षिण सोलापूरसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य अमर पाटील, माजी आमदार दिलीप माने, गणेश वानकर, मोहोळ विधानसभेसाठी नगरसेवक मनोज शेजवाल, नवनाथ क्षीरसागर, दादासाहेब पवार, नागेश वनकळसे, बार्शी विधानसभा मतदानसंघासाठी दिलीप सोपल, भाऊसाहेब अंधळकर, पंढरपूर विधानसभेसाठी शैला गोडसे, सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुलाखती दिल्या आहेत.

Related posts: